December 2, 2025 8:30 PM December 2, 2025 8:30 PM
33
Maharashtra: २८५ नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला-Nagpur Bench BHC
महाराष्ट्रातल्या सर्व २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी येत्या २१ डिसेंबरला करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत. सुरवातीच्या कार्यक्रमानुसार या सर्व जागांसाठी आज मतदान होणार होतं, मात्र न्यायालयीन अपील झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये २० डिसेंबरला मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला. यामध्ये २४ नगराध्यक्ष आणि २०४ सदस्यांच्या जागांचा समावेश आहे. \ सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत, अन्यथा २० डिसेंबरला निवडणूक होणाऱ्...