December 7, 2025 7:22 PM December 7, 2025 7:22 PM

views 161

नागपुरात उद्यापासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथं सुरूवात होत आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. अत्यावश्यक सुविधा, निवारा, पार्किंग, सुरक्षा व्यवस्था वायफाय, टपाल तसंच आहार याबाबत प्रशासनानं उत्तम पद्धतीनं नियोजन केलं असल्याचं त्यांनी नागपूर इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधे विरोधी पक्षनेतेपदाचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचं वार्ताहरांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे द...

November 14, 2025 3:39 PM November 14, 2025 3:39 PM

views 33

नागपूरमध्ये भव्य जनजातीय गौरव महोत्सवाचं आयोजन

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या दिडशेव्या जयंतीनिमित्त नागपूर इथं उद्यापासून १७ नोव्हेंबर पर्यंत भव्य जनजातीय गौरव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या राज्यपातळीवरच्या महोत्सवाचं उद्घाटन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते होणार आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊईके यांनी नागपूर इथं ही माहिती दिली. याचबरोबर राज्यातल्या सुमारे चार हजार ९७५ आदिवासी गावांमध्ये शासनाच्या सर्व विभागामार्फत समग्र विकासासाठी एक व्यापक मोहीम राबवली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

October 17, 2025 2:55 PM October 17, 2025 2:55 PM

views 15

नागपुरात हवाई दलाच्या देखरेख विभागात कमांडरांची परिषद

हवाईदलातल्या सर्व अधिकारी - कर्मचाऱ्यांनी दर्जा, व्यावसायिकता, सुरक्षा आणि कार्यक्षमता यासाठी कायम वचनबद्ध रहावं. त्यातूनच देशाच्या हवाई रक्षणासाठी भारतीय हवाई दल प्रभावीरित्या कार्यरत राहू शकेल, असं हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग यांनी आज सांगितलं. नागपुरात हवाई दलाच्या देखरेख विभागात आयोजित कमांडरांच्या परिषदेत ते बोलत होते. तांत्रिक क्षमतांचा देशांतर्गत विकास करणं या विषयावर ही दोन दिवसीय परिषद होती. 

October 10, 2025 3:27 PM October 10, 2025 3:27 PM

views 53

नागपुरात ओबीसी संघटनांचा महामोर्चा

नागपूरात आज ओबीसी संघटनांनी महामोर्चा आयोजित केला होता. कुणबी जातीच्या व्यक्तींना ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातला २ सप्टेंबरचा शासन आदेश रद्द करावा अशी त्यांची प्रमुख मागणी होती. मोठ्या संख्येने ओबीसी नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. नागपुरात यशवंत चौकातून सुरू झालेला मोर्चा संविधान चौकात संपुष्टात आला. त्यानंतर तिथे सभा घेण्यात आली. 

October 10, 2025 3:45 PM October 10, 2025 3:45 PM

views 27

नागपुरात जागतिक दर्जाचं ‘कन्व्हेन्शन सेंटर’ उभारणार

सांस्कृतिक कार्यक्रमांना हक्काचं व्यासपीठ मिळावं याकरता  नागपुरात सर्व सोयी सुविधायुक्त जागतिक दर्जाचे ' कन्व्हेन्शन सेंटर' उभारण्यात येणार आहे. याप्रकल्पासाठी  स्पेन मधल्या फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसमवेत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरला उभारण्यात येणारे 'कन्व्हेन्शन सेंटर' साठी निवडण्यात येणारी जागा सर्व परिवहन सेवांनी उत्तमरित्या जोडलेली असावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.    नागपूरचा इतिहास 'कन्व्हेन्शन सेंटर...

October 2, 2025 1:14 PM October 2, 2025 1:14 PM

views 22

नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा

जनसेवेच्या कार्यात युवकांनी मोठ्या उत्साहानं सहभागी व्हायला हवं. नैतिक मूल्यांवर आधारित राजकारणात सहभाग घेणं हे जनसेवेचं प्रभावी माध्यम असल्याचं प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त नागपूरात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. २०४७ पर्यंतच्या विकसित भारतात संघांचं महत्त्वपूर्ण योगदान असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.    यावेळी त्यांनी देश तसंच संघाच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींचं स्मरण केलं...

August 3, 2025 11:40 AM August 3, 2025 11:40 AM

views 17

स्वत:सोबत समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा बाबासाहेबांचा विचार आत्मसात करावा- सरन्यायाधीश भूषण गवई

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला दिलेल्या संविधानानं; सर्वांना समान संधी देणारी व्यवस्था देशात तयार केली, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथल्या डॉ आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात ते काल बोलत होते.   या कार्यक्रमाला सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई देखील उपस्थित होते. डॉक्टर आंबेडकर यांनी दिलेला सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा संदेश आचरणात आणण्याची गरज असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितलं.

July 6, 2025 7:31 PM July 6, 2025 7:31 PM

views 13

पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर लाभदायक ठरेल-मंत्री नितीन गडकरी

पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर लाभदायक ठरेल, असं प्रतिपादन विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. ऊसशेतीसाठी कृत्रिम तंत्रज्ञान या विषयावर नागपूर इथे एग्रोव्हीजन फाऊंडेशनने आयोजित केलेल्या विशेष कार्यशाळेत गडकरी यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. योग्य तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि संशोधन यांच्या सहाय्याने विदर्भातला शेतकरी नक्कीच प्रगती करू शकेल असा विश्वास त्यानी यावेळी व...

June 28, 2025 7:37 PM June 28, 2025 7:37 PM

views 19

देशातल्या पहिल्या कॉन्स्टीट्युशन प्रीॲम्बल पार्कचं सरन्यायाधीशांच्या हस्ते लोकार्पण

नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉच्या परिसरात उभारण्यात आलेल्या संविधान उद्देशिका पार्कचं उद्घाटन आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई, केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते झालं. पार्कच्या आवारात उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पणही यावेळी झालं. ही वास्तू बाबासाहेबांच्या कार्याचं स्मरण आणि प्रेरणा देत राहील असं न्यायमूर्ती गवई यावेळी म्हणाले. संविधानातली मूल्यं जनतेपर्यंत ...

June 2, 2025 7:36 PM June 2, 2025 7:36 PM

views 10

नागपूरमधल्या अस्थिमज्जा ट्रान्सप्लांट युनिट सुरु करण्यासाठी एनटीपीसीकडून आर्थिक मदत

नागपूरमधल्या एम्समध्ये बोन मॅरो म्हणजेच अस्थिमज्जा ट्रान्सप्लांट युनिट सुरु करण्यासाठी एनटीपीसी नं आर्थिक मदत दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत एनटीपीसी नं याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या युनिटच्या स्थापनेमुळे रुग्णांना सिकल सेल, थॅलेसेमिया, कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवर नागपूरमध्येच उपचार मिळणार असून त्यांना दिल्ली मुंबईसारख्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.