December 20, 2025 2:57 PM

views 41

राज्यातल्या २३ नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी शांततेत मतदान

राज्यातल्या २३ नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या अध्यक्ष आणि सदस्यपदांसाठी, तसंच विविध नगरपंचायतींमधल्या १४३ सदस्य-पदांसाठी आज सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे. सकाळी साडेसातला मतदान सुरुवात झाली असून साडेपाचपर्यंत ते सुरू राहणार आहे.   लातूर जिल्ह्यातल्या निलंगा नगरपरिषदेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत साडे ३७ टक्क्यापेक्षा जास्त, तर रेणापूर नगरपंचायतीसाठी जवळपास ४६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.   पालघर नगर परिषदेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत ४० टक्के, तर वाडा नगरपंचायतीसाठी ३९ टक्के मतदान झालं...

December 20, 2025 1:27 PM

views 122

राज्यातल्या २४ नगरपरिषदां – नगरपंचायतींसाठी आज मतदान

राज्यातल्या २३ नगर परिषदा आणि नगर पंचायती तसंच १५४ सदस्यपदांसाठी आज मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचत आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील झालेल्या प्रकरणांमुळे २ डिसेंबरला होणारं मतदान राज्य निवडणूक आयोगानं उद्यापर्यंत पुढे ढकललं होतं.    यवतमाळ, वाशीम, बारामती, अंबरनाथ, महाबळेश्वर, फलटण, कोपरगाव, देवळालीप्रवरा, पाथर्डी, नेवासा, फुरसुंगी- उरुळी देवाची, अनगर, मंगळवेढा, फुलंब्री, मुखेड, धर्माबाद, निल...