December 1, 2025 8:37 PM

views 41

नागालँडमध्ये हॉर्नबिल महोत्सवाला सुरुवात

नागालँडची राजधानी कोहिमा इथल्या किसामा इथं आज २६व्या हॉर्नबिल महोत्सवाची सुरुवात झाली. नागालँडचे गव्हर्नर अजय कुमार भल्ला, मुख्यमंत्री नेईफिऊ रिओ यांनी महोत्सवाचा औपचारिक प्रारंभ केला. नागालँडच्या राज्यदिनाबरोबरच सुरू होणाऱ्या या १० दिवसांच्या महोत्सवात विविध नागा समुदाय एकत्र येऊन परंपरा, लोककला, संगीत, कला आणि अन्नसंस्कृतीचा आनंद लुटतात. या महोत्सवात यावर्षी युनायटेड किंगडम, आयर्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रिया, माल्टा आणि स्वित्झर्लंड हे सहा भागीदार देश आहेत.

December 1, 2025 12:48 PM

views 21

नागालँडमधे आज २६वा हॉर्नबील उत्सव

नागालँडमधे आज २६ वा हॉर्नबील उत्सव कोहिमामधल्या किसामा इथं सुरू होत आहे. दहा दिवसांच्या या उत्सवात नागालँडमधल्या सर्व नागा जमाती एकत्र येतात. यात पारंपरिक कलाप्रकार, संगीत, लोककथा, हस्तकला आणि पाककृती यांचं प्रदर्शन केलं जातं. आज संध्याकाळी किसामा इथल्या उद्घाटन समारंभात राज्यपाल अजय कुमार भल्ला हे प्रमुख पाहुणे असतील. यंदाच्या या उत्सवात अरुणाचल प्रदेशासह ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रिया, मालता आणि स्वित्झर्लंड हे देश देखाली सहभागी होणार आहेत. हॉर्नबील उत्सवानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम साजरे के...