July 21, 2025 7:40 PM July 21, 2025 7:40 PM

views 12

नागालँडमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत भूस्खलन

गेल्या काही दिवसांपासून नागालँडमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत भूस्खलन आणि  दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. कोहीमाम इथं काल फेसेमा ते किसामा -कीगवेमा या मार्गावर भूस्खलन झालं. यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला असून याठिकाणच्या पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं आहे.  या मार्गाच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे. दरम्यान, कोहिमा ते मणिपूरला जोडणारा मार्गावरून मर्यादित प्रमाणात वाहतूक सुरू केली आहे.    नागालँडमध्ये जूनपासून सातत्यानं पाऊस पडत असल्यानं किसामाजवळचा राष्ट्रीय ...

July 8, 2025 2:29 PM July 8, 2025 2:29 PM

views 9

नागालँडमध्ये मुसळधार पावसानं भूस्खलन

नागालँडमध्ये संततधार पावसामुळे दिमापूर, निउलँड या जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी घरांची पडझड झाली आहे, असं राज्य आपत्ती प्रतिसाद दलानं सांगितलं आहे. या जिल्ह्यातल्या सखल भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचेही नुकसान झालं आहे. या आठवड्यात नागालँडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे.

December 1, 2024 12:12 PM December 1, 2024 12:12 PM

views 5

नागालँड चा आज बासष्ठावा स्थापना दिवस

नागालँड आपला बासष्ठावा स्थापना दिवस आज साजरा करत आहे. 1963 मध्ये या दिवशी नागालँड भारताचे सोळावे राज्य बनले. नागालँडच्या इतिहासातील या महत्वपूर्ण मैलाचा टप्पा साजरा करण्यासाठी राज्यभरात आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम राजधानी कोहिमा इथं होणार आहे. मुख्यमंत्री नेईफिऊ रियो याप्रसंगी लोकांना संबोधित करतील आणि गेल्या साठ वर्षातील राज्याच्या वाटचालीचा आढावा घेतील. नागालँडचे राज्यपाल ल. गणेशन यांनी नागालँड राज्य स्थापना दिवसानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दि...

September 12, 2024 10:22 AM September 12, 2024 10:22 AM

views 7

नागालँडच्या तीन जिल्ह्यांमध्ये अंतर्गत निवास परवाना लागू करायला राज्य सरकारची मंजुरी

नागालँडमध्ये तीन जिल्ह्यांमध्ये अंतर्गत निवास परवाना म्हणजे आयएलपी लागू करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. चुमोकेडिमा, निउलँड आणि दिमापूर या जिल्ह्यांमध्ये आयएलपी लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री नेफिऊ रिओ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नागालँडचे रहिवासी नसलेल्या नागरिकांना या जिल्ह्यांमध्ये प्रवेशासाठी आयएलपी लागणार आहे. हा परवाना लागणाऱ्या नागरिकांची विभागवारी करण्यात आली आहे.

September 7, 2024 12:28 PM September 7, 2024 12:28 PM

views 8

नागालँडमध्ये, सेयहामा गावात तिसरा सेंद्रीय किंग मिर्ची म्हणजे नागामिर्ची महोत्सव

नागालँडमध्ये, कोहिमा जिल्ह्यातील सेयहामा गावात काल तिसरा सेंद्रीय किंग मिर्ची म्हणजे नागामिर्ची महोत्सव आयोजित करण्यात आला. 2022 मध्ये सुरू झालेल्या या उत्सवाचा सेयहामा गावातील नागा मिर्ची उत्पादकांनाप्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. इतर राजा मिरचींपेक्षा ही मिर्ची अतिशय तिखट आणि चवीसाठी ओळखली जाते. 2008 मध्ये या मिर्चीला GI प्रमाणपत्र मिळालं आहे