April 13, 2025 8:14 PM April 13, 2025 8:14 PM

views 4

म्यानमारला ५.५ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का

म्यानमारला सकाळी ५ पूर्णांक ५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचं केंद्र मंडाले इथल्या वुंडविन शहरापासून ईशान्येला असल्याचं म्यानमारच्या हवामान शास्त्र आणि जलशास्त्र विभागाने सांगितलं आहे. म्यानमारला शुक्रवारी सकाळीही भूकंपाचा धक्का बसला होता. गेल्या महिन्यात २८ तारखेला झालेल्या भूकंपानंतर कालपर्यंत म्यानमार आणि आसपासच्या भागात एकूण ४६८ भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे.