April 6, 2025 6:52 PM April 6, 2025 6:52 PM
9
म्यानमार भूकंपातील मृतांची संख्या ३,४०० वर, पावसामुळे बचावकार्यात अडथळे
भूकंपग्रस्त म्यानमारच्या काही भागात मुसळधार पाऊस पडल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले असून रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. मंडाले इथे भूकंप झालेल्या भागात पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मदतीसाठी उभारलेल्या छावण्यांचं नुकसान झालं आहे. वाढलेलं तापमान आणि मुसळधार पाऊस यांमुळे कॉलरासारखे संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. २८ मार्च रोजी म्यानमारमध्ये ७ पूर्णांक ७ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला होता. भूकंपात मरण पावलेल्यांची संख्या ३ हजारांवर गेली असून साडे चार हजारांहून अधिक जण...