June 27, 2025 1:54 PM

views 26

युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं व्हाट्सॲपद्वारे माय भारत पोर्टल सुरू

युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं व्हाट्सॲपद्वारे माय भारत पोर्टल सुरू केलं आहे. डिजिटल सहभाग वाढवणं आणि तरुणांसाठी सेवा सुलभ करण्यासाठी हा या मागचा उद्देश आहे. ७-२-८-९-०-०-१-५-१-५ या व्हाट्सएप क्रमांकाद्वारे माय भारत पोर्टलवर व्हाट्सॲप चॅटबॉटने संवाद साधता येणार आहे. व्हॉट्सॲपद्वारे माय भारत सेवांमध्ये सोयीस्कर प्रवेश, जलद ऑनबोर्डिंग, कार्यक्रमांमध्ये सहभाग आणि अर्जांची पाठपुरवठा, रिअल-टाइम अपडेट्स आणि सुलभ समस्या अहवाल आणि निराकरण हे चॅटबॉटचे काही प्रमुख फायदे आहेत.