December 15, 2024 8:41 PM December 15, 2024 8:41 PM
16
मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षाचा बहिष्कार
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार घातला आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची आज नागपुरात बैठक झाली, त्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचं विरोधी पक्षांनी वार्ताहर परिषदेत स्पष्ट केलं. विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते वेळी उपस्थित होते. ...