December 19, 2024 8:16 PM December 19, 2024 8:16 PM
10
भारतामध्ये विमानभाडं हे बहुतेक देशांपेक्षा कमी – मुरलीधर मोहोळ
भारतामध्ये विमानभाडं हे बहुतेक देशांपेक्षा कमी असल्याचं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. लोकसभेत एका लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं निर्माण केलेल्या टॅरिफ मॉनिटरिंग युनिटने देशातल्या आणि परदेशातल्या विविध मार्गांवरच्या विमानभाड्यांचे तुलनात्मक विश्लेषण केलं असून भारतीय विमान कंपन्यांचे प्रति किलोमीटर विमानभाडं कमी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये विमानभाड्यात घट झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.