January 4, 2025 8:26 PM January 4, 2025 8:26 PM

views 23

संतोष देशमुख हत्या प्रकरणी पाच आरोपींना अटक, १८ जानेवारीपर्यंत कोठडी

सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन फरार आरोपींना बीड पोलीस दलाच्या विशेष पथकानं आज सकाळी पुण्यात अटक केली. या दोघांना पुढील तपासासाठी सी आय डी च्या ताब्यात देण्यात येणार आहे, असं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितलं . या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना फरार घोषित केलं होतं. कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे.  

January 3, 2025 2:14 PM January 3, 2025 2:14 PM

views 14

मुंबई उच्च न्यायालयानं २०१५ च्या गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणाच्या तपासावरील देखरेख थांबवण्याचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयानं २०१५ च्या गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणाच्या तपासावरील देखरेख थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणातल्या दोन फरार आरोपींना शोधून काढण्याचं मुख्य काम आता उरलं आहे, असं न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठानं काल सांगितलं. तपास यंत्रणेवरील सततच्या देखरेखीविरोधातली याचिका त्यांनी निकाली काढली. मात्र या प्रकरणातली सुनावणी दैनंदिन तत्वावर घेण्याचे निर्देश खंडपीठानं खालच्या न्यायालयाला दिले. पानसरे हत्याकांडाचा तपास सुरुवातीला गुन्हे शाखेच्या विशेष ...

January 3, 2025 10:30 AM January 3, 2025 10:30 AM

views 27

संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीस सरकार अनुकूल

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यास सरकार अनुकूल आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलतांना यासंदर्भात निकम यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले. मी माननीय उज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे. त्यांनी मला सांगितले की मला एक दोन दिवस द्या. कारण या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे. त्यानुसार मी निर्णय घेणार आहे. मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला, तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू.   विधान प...

December 14, 2024 10:19 AM December 14, 2024 10:19 AM

views 21

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग

बीड जिल्ह्यात मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग-सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ही माहिती दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ‘‘संतोष देशमुख यांचं गेल्या सोमवारी नऊ डिसेंबरला अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या गुन्ह्यातील आरोपी जयराम माणिक चाटे तसंच महेश सखाराम केदार या दोघांना, १० डिसेंबर रोजी धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीमधून तर अन्य एक आरोपी प्रतिक भिमराव घुले यास ११ डिसेंबर रोजी पुण्यातून अटक करण्यात आली.  ...

October 18, 2024 3:04 PM October 18, 2024 3:04 PM

views 10

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी शिवकुमार गौतम याच्यासह तिघांविरोधात लुक आऊट नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी शिवकुमार गौतम याच्यासह तिघांविरोधात मुंबई पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे. यात शुभम लोणकर आणि मोहम्मद जिशान अख्तर यांचा समावेश आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाची पथकं देशाच्या विविध भागात रवाना झाली आहेत.   दरम्यान,या प्रकरणातला एक आरोपी गुरमेल याच्या हरियाणातील कथैल गावातही मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी चौकशीसाठी गेले आहेत. तिथं त्याच्या मित्रांची सखोल चौकशी केली जा...

September 6, 2024 7:06 PM September 6, 2024 7:06 PM

views 30

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !

मुंबईतले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्येचा तपास मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला आहे. फेब्रुवारी महिन्यात फेसबुक लाइव्हमध्ये बोलत असताना गोळी झाडून त्यांची हत्या झाली होती. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत होती. पण त्यातल्या त्रुटींमुळं हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले.