August 27, 2024 9:09 AM August 27, 2024 9:09 AM
4
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं नाव देण्यात यावे – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं नाव देण्यासाठी, राज्य शासनाने प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवावा, असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. या संदर्भात मोहोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.