January 14, 2026 5:55 PM
21
हरलेली बाजी जिंकण्यासाठी निवडणूक आयोग सरकारला मदत करत असल्याचा राज ठकरे यांचा आरोप
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सरकारला हव्या त्या सुविधा देण्यासाठी निवडणूक आयोग रोज कायदे बदलत असून, हरलेली बाजी जिंकण्यासाठी निवडणूक आयोग सरकारला मदत करत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरेही यावेळी उपस्थित होते. प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट अर्थात ‘पाडू’ नावाचं यंत्र या निवडणुकीत वापरणार असल्याचं आयोगानं कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, किंवा दाखवलेलं नाही. यावर उद्धव...