December 16, 2025 3:05 PM

views 34

२९ महानगरपालिकांचे महापौर हे महायुतीचेच, बावनकुळेंचा विश्वास

राज्यात महायुती ५१ टक्के मताधिक्य घेऊन महानगरपालिका निवडणुका जिंकेल आणि २९ महानगरपालिकांचे महापौर हे महायुतीचेच होतील असा विश्वास भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केला. नागपूरच्या कोराडी येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान हा पक्ष आमचा मित्र पक्ष असून अमरावतीमध्येसुद्धा महायुतीच लढणार असं त्यांनी स्पष्ट केलं.

December 4, 2025 7:05 PM

views 95

संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेण्याचे राज्य निवडणूक आयुक्तांचे आदेश

महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधल्या संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. राज्यातल्या सर्व महानगरपालिका आयुक्तांची आज दूरस्थ पद्धतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत वाघमारे यांनी हे आदेश दिले आहेत. प्रारुप मतदार याद्यांवरच्या हरकती आणि सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करावा, प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना झालेल्या चुका निदर्शनाला आल्या तर तक्रारींची वाट न पाहता त्या दुरुस्त कराव्यात असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत...

November 26, 2025 7:13 PM

views 137

महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करायला मुदतवाढ

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करणं, तसंच अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत आता २७ नोव्हेंबर ऐवजी ३ डिसेंबर झाली आहे, हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करण्याची मुदत ५ डिसेंबर ऐवजी १० डिसेंबर, मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिध्द करण्याची मुदत ८ डिसेंबर ऐवजी १५ डिसेंबर आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रस...