January 2, 2026 7:41 PM January 2, 2026 7:41 PM

views 53

राज्यात अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक

महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत आज संपली. आता ठिकठिकाणच्या लढतींचं चित्र स्पष्ट होईल. अनेक ठिकाणी  उमेदवारांना प्रतिस्पर्धी न उरल्यानं त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक ठिकाणी मुळातच एकमेव अर्ज आले होते, तर काही ठिकाणी छाननीत इतर अर्ज बाद झाल्यानं उमेदवार बिनविरोध आहेत. उद्या निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल.    उमेदवारी मागे घेण्याच्या घडामोडींमुळे ठाणे शहरात शिवसेनेच्या  पाच उमेदवारांना प्रतिस्पर्धी उरलेले नाहीत....

January 2, 2026 7:41 PM January 2, 2026 7:41 PM

views 16

उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव, निवडणूक आयोगानं मागवला अहवाल

राज्यात होत असलेल्या महानगर पालिकांच्या निवडणुकीतल्या  नामांकन प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर , उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी  दबाव, प्रलोभन किंवा जबरदस्तीला बळी पडावं लागलेलं नाही, याची खात्री करून घ्यावी आणि तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश निवडणूक आयोगानं संबंधित महानगर पालिकांना दिले आहेत.