January 22, 2026 3:14 PM

views 6

मुंबई विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांची दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदकांची कमाई

भारतीय विद्यापीठ संघाच्या वतीने आयोजित केलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात मुंबई विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे. गुजरातमधल्या सरदार पटेल विद्यापीठात काल ही स्पर्धा झाली. यात मूलभूत शास्त्र आणि सामाजिक शास्त्र गटात दोन सुवर्ण तर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि आरोग्य विज्ञान गटात दोन कांस्य पदकं मुंबई विद्यापीठाने जिंकली.