December 2, 2024 7:35 PM December 2, 2024 7:35 PM

views 7

मुंबई विद्यापीठाच्या जैवभौतिकशास्त्र विभागात गॅमा इरॅडिएशन चेंबरचं उद्घाटन

मुंबई विद्यापीठाच्या जैवभौतिकशास्त्र विभागात गॅमा इरॅडिएशन चेंबरचं नुकतंच उदघाटन झालं. या सुविधेमुळे देशभरातल्या शैक्षणिक संस्था आणि  संशोधकांसाठी किरणोत्सर्ग संशोधन क्षेत्रातल्या संधीचं दालन खुलं झालं आहे. या सुविधेमुळे आरोग्यसेवा, अन्न प्रक्रिया, साहित्य विज्ञान आणि अभियांत्रिकी यासारख्या क्षेत्रांना चालना मिळणार आहे. यावेळी आयोजित कार्यशाळेत किरणोत्सर्ग आणि किरणोत्सर्ग जीवशास्त्र क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांनी विविध पैलूंवर प्रकाश टाकला तसेच काही प्रात्यक्षिकं सादर केली.

November 22, 2024 3:38 PM November 22, 2024 3:38 PM

views 11

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉसकंट्री स्पर्धेत मुंबई विद्यापीठाला पहिल्यांदाच सुवर्ण पदक

मंगळूर विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉसकंट्री स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या राज तिवारी या खेळाडूनं उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलं. तिवारीनं ३० मिनिटं ५९ सेकंद वेळ देत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवलं. मुंबई विद्यापीठानं क्रॉसकंट्री स्पर्धेत पहिल्यांदाच वैयक्तित गटात सुवर्ण पदक तर पुरुष संघाचं उपविजेतेपद पटकवलं आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या संघाचं अभिनंदन केलं. 

November 18, 2024 8:07 PM November 18, 2024 8:07 PM

views 4

मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या फेरपरीक्षांचे निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या फेरपरीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. बीकॉमच्या सहाव्या सत्राच्या एटीकेटी परीक्षेसाठी १४ हजार १९१, बीएससी सहाव्या सत्रासाठी २ हजार ९२६ तर बीकॉम अकाउंट अँड फायनान्ससाठी १ हजार ३१ विद्यार्थी बसले होते. सर्व निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी दिली.  

November 14, 2024 3:04 PM November 14, 2024 3:04 PM

views 7

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेत मुंबई विद्यापीठाला दोन कांस्य पदकं

पंजाबमधल्या अमृतसर इथल्या गुरुनानक देव विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने दोन कांस्य पदकं पटकावली आहेत. ६८ किलो वजनी गटात सय्यद उमर आणि ८७ किलो वजनी गटात राज घुले या दोघांनी कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. विजयी खेळाडूंसह प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक यांचं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी अभिनंदन केलं आहे. या स्पर्धेत देशभरातले १२७ विद्यापीठं सहभागी झाली होती.

November 7, 2024 6:57 PM November 7, 2024 6:57 PM

views 6

एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा – सीबीटीच्या वेळापत्रकात बदल

मुंबई विद्यापीठातर्फे एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा - सीबीटीच्या वेळापत्रकात बदल केला आहे. ऑनलाईन माध्यमातून होणारी ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १० नोव्हेंबरला होणार होती आता ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनंच १७ नोव्हेंबरला विविध केंद्रावर घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी साडेचार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीनं अर्ज सादर केले आहेत.

September 21, 2024 6:59 PM September 21, 2024 6:59 PM

views 14

अधिसभेची निवडणूक उद्याच घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई विद्यापीठाला आदेश

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक उद्याच घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं विद्यापाठीला दिले आहेत. या निवडणुकीची सर्व तयारी झालेली असताना राज्य सरकारच्या आदेशावरुन काल अचानक विद्यापीठानं ही निवडणूक स्थगित केली होती. त्याला युवासेनेच्या मिलिंद साटम, शशिकांत झोरे आणि प्रदीप सावंत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या नेतृत्वाखालील विशेष खंडपीठानं तातडीची सुनावणी घेतली आणि उद्याच निवडणूक घेण्याचे आदेश दिले.