March 18, 2025 7:44 PM

views 24

क्लायमेट स्कील उपक्रमासाठी मुंबई विद्यापीठाची निवड

ब्रिटीश कौन्सिलच्या क्लायमेट स्कील उपक्रमासाठी मुंबई विद्यापीठाची निवड झाली आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली आणि शाश्वत विकास ही या कार्यक्रमाची उद्दीष्टं असून देशभरातल्या तीन उच्च शिक्षण संस्थांची निवड केली आहे.   या उपक्रमातून युवकांना हवामान बदलांविषयी जागरुक करुन संबधीत समस्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचं प्रशिक्षण दिलं जाईल. भारतासह ब्राझिल, मेक्सिको, इंडोनेशिया आणि व्हिएनतनाममध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे.

March 16, 2025 3:09 PM

views 25

मुंबई विद्यापीठात महिला कर्तृत्वाच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन

मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या महिला पदवीधर आणि  भारतातल्या पहिल्या महिला वकील कॉर्नेलिया सोरोबजी यांच्या वकिलीच्या शताब्दी वर्षानिमित्त तसंच विविध क्षेत्रांतल्या महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी काल मुंबई विद्यापीठात महिला कर्तृत्वाचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. याशिवाय ‘ब्रेकिंग ग्लास सिलिंगः वुमन हू मेड इट’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादही आयोजित केला होता.   परिसंवादाचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या हस्ते झालं. राज्याच्या पह...

March 15, 2025 8:13 PM

views 16

केंद्रातील राज्य सरकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या किमान ३० टक्के कायदा अधिकाऱ्यांमध्ये महिला असणं आवश्यक- न्यायमूर्ती नागरत्ना

केंद्र आणि राज्य सरकारचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कायदा अधिकाऱ्यांमध्ये किमान ३० टक्के महिलांचा समावेश असणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी केलं आहे. ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी असलेल्या आरक्षणाचं  कौतुक करत त्यांनी खंडपीठावर सक्षम महिला वकिलांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती द्यायला हवी, असं आवाहन त्यांनी केलं. मुंबई विद्यापीठात आयोजित ‘ब्रेकिंग ग्लास सिलिंग ; वुमन हू मेड इट’ या विषयावरच्या चर्चासत्रात ते  आज बोलत  होते. ४५ व...

February 23, 2025 5:06 PM

views 25

मुंबई विद्यापीठानं २६व्या क्रीडा महोत्सवात ४३० गुणांसह पटकावलं विजेतेपद

राजभवनातर्फे आयोजित २६व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात मुंबई विद्यापीठानं ४३० गुणांची कमाई करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. पुरुष गटात २०० गुण आणि महिला गटात २३० गुण मिळवून मुंबई विद्यापीठानं हा बहुमान मिळवला.  गडचिरोलीतल्या गोंडवाना विद्यापीठात १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव झाला. विविध स्पर्धा प्रकारात मुंबई विद्यापीठानं  ५ सुवर्ण ६ रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई केली.  मुंबई विद्यापीठाच्या मुलींच्या संघानं खोखो, टेबल टेनिस, कबड्डी यात तर मुलांनी बॅडमिंटन आणि बुद्ध...

February 20, 2025 7:16 PM

views 11

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृहं आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दोन स्वतंत्र वसतीगृहं आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी केली आहे. मुंबई विद्यापिठात आयोजित संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र माता रमाबाई आंबेडकर यांच्या नावानं ओळखलं जाईल, असं त्यांनी सांगितलं. मुंबई विद्यापिठातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात प्राध्यापक आणि संशोधक पदा...

January 15, 2025 8:41 PM

views 29

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेत सलग ६व्या वर्षी मुंबई विद्यापिठाला विजेतेपद

१७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेत सलग सहाव्या वर्षी मुंबई विद्यापिठानं विजेतेपद पटकावलं आहे. लोणेरेमधल्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात १२ जानेवारीपासून आयोजित या स्पर्धेत मुंबई विद्यापीठानं ९२ गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. मुंबई विद्यापीठानं १३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई केली.  विद्यापीठाच्या ४८ पैकी २३ संशोधन प्रकल्पांना पारितोषिकं मिळाली. या संशोधन प्रकल्पांना स्टार्ट-अप मध्ये रुपांतर करण्यासाठी मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांना स...

January 1, 2025 3:19 PM

views 28

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

मुंबई विद्यापीठानं उन्हाळी सत्राच्या विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मार्चमध्ये या परीक्षांना सुरुवात होईल. या परीक्षांना १ लाख ३८ हजार विद्यार्थी बसणार असून त्याकरता ४३९ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे विषय, आसन क्रमांक आणि अनुषंगिक तपशीलाबाबतची तात्पुरती प्रवेशपत्रं महाविद्यालयांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असं विद्यापीठानं कळवलं आहे.

December 17, 2024 2:58 PM

views 16

मुंबई विद्यापीठाचा महिला फुटबॉल संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र

मुंबई विद्यापीठाचा महिला फुटबॉल संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. राजस्थानमधल्या वर्धमान महावीर मुक्त विद्यापीठ, कोटा इथं  ७  ते ११ डिसेंबर २०२४ दरम्यान झालेल्या पश्चिम विभागीय महिला फुटबॉल स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या महिला फुटबॉल संघानं एम. एल. एस.  विद्यापीठ, उदयपुर  संघाला  ६-० नं हरवलं.  या स्पर्धेत ४५ विद्यापीठाचे संघ सहभागी झाले होते.

December 14, 2024 4:58 PM

views 17

मुंबई विद्यापीठात दुहेरी पदवी, सह पदवी आणि ट्विनिंग पदवी शिक्षणासाठी विद्या परिषदेची मंजुरी

मुंबई विद्यापीठात दुहेरी पदवी, सह पदवी आणि ट्विनिंग पदवी शिक्षणासाठी विद्या परिषदेनं मंजुरी दिली आहे. यानुसार विद्यार्थ्यांना दोन महाविद्यालयं किंवा उच्च शिक्षण संस्थांमध्ये एकत्र प्रवेश घेता येणार आहे. यामुळे शिक्षण प्रणालीमध्ये मोठा बदल होणार असून सर्वोत्कृष्ट शैक्षणिक पद्धतीच्या सामायीकीकरणाला प्रोत्साहन मिळेस, असं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या पदांच्या नियुक्तीला...

December 9, 2024 7:27 PM

views 26

मुंबई विद्यापीठाच्या भारतीय भाषा संवर्धन आणि प्रसार केंद्राची स्थापना

भारतीय भाषांचा प्रभाव लोकमानसात कायम राहावा या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या भारतीय भाषा संवर्धन आणि प्रसार केंद्राची स्थापना केली जात आहे. विद्यापीठाच्या विविध विभागातल्या मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, कन्नड, सिंधी, पाली, प्राकृत, उर्दू आणि अवेस्ता पहलवी अशा २२ भाषांचा यात समावेश असेल. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेत या अनुषंगाने ठराव करण्यात आला. या केंद्राच्या माध्यमातून शैक्षणिक लेखन आणि अनुवादाला प्रोत्साहन दिलं जाणार असून त्याचबरोबर इतर भाषेतील शैक्षणिक साहित्य प्रादेशिक भाषेत भाषा...