August 28, 2024 3:23 PM

views 10

मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

गुजरातमधे वडोदरा इथं मुसळधार पाऊस सुरु असल्यानं मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या  रद्द करण्यात आल्या आहेत. सौराष्ट्र जनता एक्सप्रेस, लोकशक्ती एक्सप्रेस आणि सौराष्ट्र मेल या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच राणकपूर एक्सप्रेस, भगवत की कोठी एक्सप्रेस आणि जयपूर एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या असून त्या विलंबानं धावत असल्याचं वृत्त आहे.  गेले काही दिवस गुजरातमधे जोरदार पाऊस सुरु असून यात आत्ता पर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. सखल भागातल्या सुमारे पंधर...