March 1, 2025 7:55 PM March 1, 2025 7:55 PM

views 7

AI चा प्रवास भारताशिवाय अपूर्ण – मंत्री पीयूष गोयल

जागतिक कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवास भारताशिवाय अपूर्ण असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज 'मुंबई टेक वीक २०२५' मध्ये उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते.  भारतासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता हे दीर्घकालीन धोरण असून आंतरराष्ट्रीय व्यापार करारांमध्ये ते महत्त्वाचा भाग असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत सध्या ७-८ प्रमुख विकसित देशांसोबत डेटा शेअरिंग नियमांबाबत सक्रिय चर्चा करत असल्याची माहिती त्यांनी दिली.