September 25, 2024 7:02 PM September 25, 2024 7:02 PM
9
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं ८५ हजारांची पातळी ओलांडली
जागतिक बाजारातल्या तेजीमुळं देशातल्या दोन्ही शेअर बाजारांनी आज विक्रमी पातळी गाठली. सेन्सेक्स पहिल्यांदाच ८५ हजारांच्या वर आणि निफ्टी पहिल्यांदाच २६ हजारांच्या वर जाऊन बंद झाले. घसरणीसह सुरू झालेल्या शेअर बाजारात अखेरच्या अर्धा तासात जोरदार तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्स २५६ अंकांची तेजी नोंदवून ८५ हजार १७० अंकांवर बंद झाला. निफ्टी ६४ अंकांची वाढ नोंदवून २६ हजार ४ अंकांवर स्थिरावला.