October 16, 2025 3:13 PM October 16, 2025 3:13 PM
34
देशातल्या शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तेजी
अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून दर कपातीची अपेक्षा, जागतिक बाजारातलं सकारात्मक वातावरण यामुळं सलग दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी आहे. सकाळपासून असलेली तेजी दुपारपर्यंत आणखी वाढत गेली. बँका, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, ग्राहकोपयोगी वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे समभाग आज तेजीत आहे. सध्या सेन्सेक्समध्ये ९०० हून अधिक अंकांनी वाढ झाली असून हा निर्देशांक ८३ हजार ५०० अंकांच्या पुढे व्यवहार करतो आहे. निफ्टी सुमारे ३०० अंकांनी वधारला असून त्यात २५ हजार ६०० अंकांच्या पलीकडे व्यवहार ...