September 19, 2025 7:52 PM September 19, 2025 7:52 PM

views 11

मुंबईत सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पाचं ५० टक्के काम पूर्ण

मुंबई महानगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या खड्डेमुक्त मुंबई उपक्रमाला गती मिळाली असून आतापर्यंत शहरात आतापर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पाचं ५० टक्के काम पूर्ण झालं आहे. उर्वरित कामं  ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात पूर्ण करण्याचे तसंच स्थानिक नागरिकांची मागणी आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्याशिवाय नवीन रस्त्यांची खोदकामं  केली जावू नयेत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज पालिका प्रशासनाला दिले.