August 19, 2025 11:55 AM August 19, 2025 11:55 AM
12
मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाचं थैमान
मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाचं थैमान अखंड सुरू आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत आज सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळे पश्चिम वाहतूक, लोकलसेवा आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे. आज सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत विक्रोळीत २५५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. भायखळ्यात २४१, सांताक्रूझला २३८पेक्षा जास्त, जुहूला २११, बांद्र्याला २११, कुलाब्याला ११० मिलिमीटरपेक्षा जास्त, तर महालक्ष्मी इथं साडे ७२ मिलिमीटर पाऊस पडला. मुंबईतली सगळी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना ...