August 18, 2025 8:33 PM August 18, 2025 8:33 PM

views 2

राज्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती

राज्यात अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस पडला. अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात काही ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागानं मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, कोल्हापूर घाट या भागांना रेड अलर्ट तर, पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट दिला आहे. समुद्र खवळलेला असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा ...

May 21, 2025 3:53 PM May 21, 2025 3:53 PM

views 123

राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार पाऊस

मुंबई शहर, उपनगरासह कोकणात काल वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला असून आणखी चार दिवस राज्यात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यांना आज आणि उद्यासाठी यलो तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे. मान्सूनच्या अनुकूल स्थितीमुळे वेळेपूर्वीच पावसाला सुरुवात झाली असून यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात गेल्या १५ दिवसांपासून बिगरमोसमी पाऊस होत आहे.   मुंबई आ...

May 13, 2025 1:36 PM May 13, 2025 1:36 PM

views 10

मुंबईत पावसाला सुरूवात

मुंबई आणि उपनगरांत आज सकाळी अवकाळी पाऊस पडला. सकाळपासूनच शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण होतं. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळी नऊ वाजल्यापासून अवकाळी पावसाच्या जोरदार सरी पडल्या.  भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या  यलो अलर्ट जारी केला असून, शहरात वादळी वारे, गडगडाट, आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबईत अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

August 4, 2024 1:46 PM August 4, 2024 1:46 PM

views 13

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या घाट भागात अतिवृष्टीची शक्यता

भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या घाट भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. तसंच पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नैऋत्य राजस्थान आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. या महिन्याच्या १० तारखेपर्यंत जम्मू-काश्मीर आणि पंजाब, तसंच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातह...

July 8, 2024 12:46 PM July 8, 2024 12:46 PM

views 11

पाण्याचा निचरा करण्यासाठी अतिरिक्त जलपंप उपलब्ध – मंत्री दीपक केसरकर

मुंबई शहरात सध्या फक्त कुर्ला आणि शीव या भागात पाणी साठलेलं असून  त्याचा निचरा करण्यासाठी अतिरिक्त पंप उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईतलं जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सध्या परिस्थिती काय आहे आणि ती पूर्ववत करण्यासाठी काय पावलं सरकार उचलत आहे, याबाबतचं निवेदन सरकारने करावं, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्यानंतर ते बोलत होते.    मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व श...