August 1, 2024 7:55 PM August 1, 2024 7:55 PM

views 12

महामार्ग दुरुस्त केला नाही तर ‘ निलंबन ‘ – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई-नाशिक महामार्गावरची वाहतूक येत्या १० दिवसांत सुरळित झाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. ते आज मंत्रालयात या महामार्गाच्या सुधारणेबाबत आयोजित बैठकीत बोलत होते.   मुंबई-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. त्यावर सध्या काही ठिकाणी उड्डाणपुलांची कामं सुरु आहेत. त्यातच पावसामुळे महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास होत असून प्रवासाचा वेळही ८ ते १० तासांवर प...