July 24, 2025 1:11 PM July 24, 2025 1:11 PM
20
मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपींची निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला SC ची स्थगिती
मुंबई उपनगरीय रेल्वेत २००६ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला आज सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर आज न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन.के. सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राज्य सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात म्हणणं मांडलं. उच्च न्यायालयाच्या निकालातल्या काह...