November 5, 2025 3:48 PM November 5, 2025 3:48 PM
34
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ६ तास बंद!
देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरचं कामकाज सहा तास थांबवण्यात येणार आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दोन्ही धावपट्ट्या तात्पुरत्या बंद राहतील. या दरम्यान धावपट्ट्यांची तपशीलवार तपासणी, पृष्ठभागांची दुरुस्ती, प्रकाशयोजना, चिन्हं तसंच सांडपाणी व्यवस्थेचं तांत्रिक मूल्यांकन केलं जाणार आहे.