April 22, 2025 11:46 AM April 22, 2025 11:46 AM

views 2

दिव्यांग आणि विशेष व्यक्तींसाठी अपुऱ्या सुविधांविषयी मुंबई उच्च न्यायालयाची चिंता व्यक्त

देशभरातल्या विमानतळांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विशेष व्यक्तींसाठी दिल्या जाणाऱ्या अपुऱ्या सुविधांविषयी मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. विमानतळांवर व्हीलचेअरच्या कमतरतेमुळे या व्यक्तींना त्रास होऊ नये यासाठी नागरी विमान वाहातूक संचालनालय, विमानतल संचालक आणि विमान कंपन्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या संदर्भात दाखल दोन याचिकांवर सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले.

April 8, 2025 3:47 PM April 8, 2025 3:47 PM

views 12

कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाची सुनावणी

कॉमेडियन कुणाल कामरा याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकार आणि आमदार मूरजी पटेल यांना उत्तर द्यायला सांगितलं. तसंच कुणाल कामराला १६ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी आपल्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द करायची मागणी कामरा यानं याचिकेद्वारे केली होती.

April 7, 2025 3:56 PM April 7, 2025 3:56 PM

views 10

कॉमेडियन कुणाल कामराच्या विरोधातल्या FIR ला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

कॉमेडियन कुणाल कामराने मुंबई पोलिसांनी त्याच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआरला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक वक्तव्य केल्याबद्दल कामराविरुद्ध प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे. राज्यघटनेनं दिलेल्या अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्यासह मूलभूत अधिकारांवर घाला घालणारी ही कारवाई असल्याचा दावा कामरानं गेल्या शनिवारी दाखल केलल्या याचिकेत केला आहे. या याचिकेवर २१ एप्रिलला सुनावणी होणार आहे. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या फिर्यादीनंतर पोलिसा...

February 21, 2025 3:07 PM February 21, 2025 3:07 PM

views 13

मुंबई उच्च न्यायालयात तीन न्यायाधीशांच्या स्थायी नियुक्तीला न्यायवृदांची मंजुरी

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृदांने मुंबई उच्च न्यायालयामधल्या तीन अतिरिक्त न्यायाधीशांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करायला मंजुरी दिली. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या न्यायवृंदाच्या बैठकीत हा निर्णय झाला.   शैलेश ब्रह्मे, फिरदौश पुनावाला आणि जितेंद्र शांतिलाल जैन यांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करायला न्यायवृंदाने मान्यता दिली आहे.यासोबतच मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांना एका वर्षाची मुदतवाढ देण्याची शिफार...

August 16, 2024 7:06 PM August 16, 2024 7:06 PM

views 10

विनायक राऊतांच्या याचिकेवर नारायण राणेंनी उत्तर देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

नारायण राणे यांची खासदारकी रद्द करण्यासंबंधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर १२ सप्टेंबरपर्यंत उत्तर द्यायचे निर्देश उच्च न्यायालयानं राणे यांना दिले आहेत.  राणे यांनी अवैध मार्गांनी ही निवडणूक जिंकली असल्याची याचिका राऊत यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यावर आज न्यायलयानं राणे यांना हे निर्देश दिले आहेत.

August 6, 2024 7:24 PM August 6, 2024 7:24 PM

views 11

खासगी महाविद्यालयातला हिजाब आणि बुरखा बंदीचा नियम कायम ठेवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

मुंबईतल्या खासगी महाविद्यालयातला हिजाब आणि बुरखा बंदीचा नियम कायम ठेवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज मंजुरी दिली. मुंबईतल्या चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या एनजी आचार्य आणि डीके मराठे महाविद्यालयाच्या परिसरात हिजाब आणि बुरख्यावर बंदी घालण्याचा महाविद्यालय प्रशासनाचा निर्णय २६ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवला होता. या निर्णयाविरोधात मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल...