June 20, 2024 7:02 PM June 20, 2024 7:02 PM

views 6

‘पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी करण्यासाठी पाठवलेले अर्ज बाद करण्यात आले’

मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी मतदारांची नोंदणी करण्यासाठी आपण पाठवलेले अर्ज बाद करण्यात आले असून भाजपाने पाठवलेले अर्ज स्वीकारले गेल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. या संदर्भात खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारणा केली. तसंच अर्ज बाद करण्याचं कारण विचारल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल देसाई यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं.