January 3, 2025 2:12 PM January 3, 2025 2:12 PM

views 6

मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. वीर रेल्वे स्थानकाजवळ एका टोइंग वाहनानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. ज्यामुळे कारमधले तीन जण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

August 26, 2024 3:46 PM August 26, 2024 3:46 PM

views 12

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्याच्या सूचना

मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी सुरळीत करावा अशा सूचना, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाच्या तांत्रिक सल्लागारांनी, संबधित विभागाला दिल्या आहेत. मुंबई-गोवा राज्य महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत  खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं होतं.

August 24, 2024 4:07 PM August 24, 2024 4:07 PM

views 10

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. ५ सप्टेंबरला मध्यरात्री १२ वाजल्यापासून ८ सप्टेंबरला रात्री ११ वाजेपर्यंत, ११ सप्टेंबरला रात्री ८ वाजल्यापासून १३ सप्टेंबरला रात्री ११ वाजेपर्यंत तर १७ सप्टेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून १८ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत ही बंदी लागू असेल. या कालावधीत अत्यावश्यक वस्तू, खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या बंदीतून सूट मिळेल.

June 17, 2024 3:48 PM June 17, 2024 3:48 PM

views 7

परशुराम घाटात दरडप्रवण क्षेत्राची पहाणी

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूणजवळच्या परशुराम घाटात दरडप्रवण क्षेत्राची पहाणी केली. जिल्हा पोलिस अधिक्षक तसंच संबधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. खेडच्या तहसीलदार कार्यालयात तालुक्यातल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.