January 26, 2025 7:26 PM January 26, 2025 7:26 PM
8
मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ आणि इंधन यात मोठी बचत होणार असून प्रदूषण कमी करण्यात हा मार्ग महत्त्वाची भूमिका बजावेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तरवाहिनी मार्गासह इतर तीन आंतरमार्गिका उद्यापासून वाहतुकीसाठी खुल्या होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच मंत्री आशीष शेलार, मंगल प्...