December 21, 2024 8:16 PM December 21, 2024 8:16 PM
3
प्रवासी बोटीला झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या १५ वर
मुंबईत गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा गुंफांच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवासी बोटीला १८ डिसेंबर रोजी झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या १५ झाली आहे. या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या एका सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह आज दुपारी बचाव पथकाला सापडला. या मुलाच्या आईचाही या अपघातात मृत्यू झाला होता. भारतीय नौदलाची बोट अनियंत्रित होऊन प्रवासी बोटीला धडकल्याने झालेल्या या अपघातात दोन्ही बोटींमधल्या एकंदर ११३ प्रवाशांपैकी ९८ जणांना वाचवण्यात यश आलं होतं. १३ जण अपघाताच्या दिवशीच मृत्युमुखी पडले, तर दोन जण बेपत्ता होत...