October 13, 2024 7:19 PM October 13, 2024 7:19 PM

views 7

मुंबई विमानतळावर ५९ लाख ६० हजार रुपये किमतीचा ५९६ ग्रॅम गांजा जप्त

मुंबईच्या विमानतळ आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर एका प्रवाशाकडून अंदाजे ५९ लाख ६० हजार रुपये किमतीचा ५९६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. विमानतळावरच्या हवाई गुप्तचर विभागाने संशयाच्या आधारावर एका प्रवाशाला अडवून त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या ट्रॉलीत खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये हा गांजा लपवून आणल्याचं आढळलं.

September 14, 2024 6:29 PM September 14, 2024 6:29 PM

views 13

मुंबई विमानतळावर गेल्या २ दिवसात साडेसात किलो सोनं जप्त

मुंबई विमानतळावरुन गेल्या दोन दिवसात तस्करी करुन आणलेलं साडेसात किलो सोनं जप्त करण्यात आलं असून त्याची बाजारातली किंमत ५ कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती विमानतळ झोन ३ च्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोने तस्करीच्या एकूण ७ प्रकरणांमध्ये ही जप्ती करण्यात आली असून या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये विमानतळ प्राधिकरणाच्या काही कंत्राटी कामगारांचाही समावेश आहे. सोने तस्करी प्रकरणी ६ कंत्राटी कामगारांबरोबर दुबई आणि मादागास्करहून आलेल्या प्रवाशांचा समावेश आहे.

June 16, 2024 8:01 PM June 16, 2024 8:01 PM

views 10

मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई

सीमाशुल्क विभागानं मुंबई विमानतळावर गेल्या तीन दिवसात अकरा जणांकडून एकूण दहा किलोहून अधिक सोने जप्त केलं. या सोन्याची एकूण किंमत ६ कोटी ७१ लाख एवढी आहे. मेणाच्या वस्तू, दागिन्यांचे साचे तसंच अंगावरुन अशा विविध मार्गाने या सोन्याची तस्करी होत होती.   १४ ते १६ जून या कालावधीत शारजा ते मुंबई, मुंबई ते काठमांडू, दुबई, अदिसअबाबा अशा अनेक ठिकाणांहून प्रवास करणाऱ्यांकडून या सोन्याची गैरमार्गाने वाहतूक केली जात होती.