August 7, 2025 3:05 PM August 7, 2025 3:05 PM

views 8

मुंबई विमानतळावर साडे १४ किलो वजनाचा गांजा जप्त

मुंबईतल्या विमानतळ आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी साडे १४ किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. याची किंमत अंदाजे १४ कोटी ५० लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी एक जणाला अटक करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५ ऑगस्टच्या रात्री एक संशयीत प्रवासी जकात अधिकाऱ्यांना आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे साडे १४ किलो वजनाचा गांजा सापडला. 

July 31, 2025 2:39 PM July 31, 2025 2:39 PM

views 9

मुंबई विमानतळावर गेल्या दोन दिवसात सुमारे ८ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

सीमाशुल्क विभागानं मुंबई विमानतळावर गेल्या दोन दिवसात सुमारे ८ कोटी रुपये किंमतीची ८ किलो अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी   दोन वेगवेगळ्या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली आहे.   बँकॉकहून आलेल्या दोन वेगवेगळ्या विमान कंपन्यांच्या प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आली. एका प्रकरणात तीन प्रवाशांकडून तब्बल दोन किलो तर दुसऱ्या प्रकरणात बँकॉकहूनचं आलेल्या इंडिगोच्या एका प्रवाशाकडून ६ किलो वीड जप्त करण्यात आलं. या चौघांनाही अटक करण्यात आली आहे. 

April 8, 2025 3:17 PM April 8, 2025 3:17 PM

views 2

मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई

मुंबई विमानतळावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दोन प्रवाशांकडून ९ कोटी ५३ लाख रुपयांचा गांजा आणि ५८ लाख ८३ हजार रुपये किमतीचं सोनं जप्त केलं. याप्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. एक प्रवासी बँकॉकहून इंडिगो एअरलाइन्सच्या विमानानं मुंबईला तर दुसरा इंडिगो एअरलाइन्सच्या विमानानं दुबईहून मुंबईला आला होता.  

March 31, 2025 1:17 PM March 31, 2025 1:17 PM

views 6

मुंबई विमानतळावर प्रवाशाकडून ३ किलो गांजा जप्त

मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने बँकॉकवरून येणाऱ्या एका प्रवाशाकडून ३ किलो गांजा जप्त केला आहे. आरोपी केरळचा रहिवासी असून हा गांजा त्याला बेंगळुरूमध्ये मुख्य तस्कराकडे पोहोचवायचा होता. त्या बदल्यात त्याला प्रतिग्रॅम दीड लाख रुपये मिळणार असल्याचं त्याने चौकशीत कबूल केलं.

March 15, 2025 3:37 PM March 15, 2025 3:37 PM

views 8

मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक

मुंबईत सीमाशुल्क विभागाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सोन्याची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून तस्करीचं साडेतीन कोटीपेक्षा जास्त किंमतीचं सोनं जप्त केलं आहे.   सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री संशयावरून एकाला ताब्यात घेतलं आणि त्याची झडती घेतली असता सोन्याची भुकटी असलेली पाकिटं त्याच्याकडे सापडली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इतर दोघांनाही अटक केली आणि त्यांच्याकडून सोनं जप्त केलं.

March 11, 2025 8:54 PM March 11, 2025 8:54 PM

views 9

मुंबईहून अवैधरीत्या लंडनला जाणाऱ्या ८ जणांना अटक

मुंबईहून अवैधरीत्या लंडनला जाणाऱ्या ८ जणांना आज पोलिसांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. हरयाणात हिसार इथल्या खासगी विद्यापीठाचे ७ विद्यार्थी आणि एक प्राध्यापक, युवा विनिमय कार्यक्रमाअंतर्गत लंडनला जात असल्याचं भासवून हे सर्व ८ जण लंडनला निघाले होते. मात्र इमिग्रेशन खिडकीवर त्यांच्या सांगण्यात विसंगती आढळल्यानं त्यांची कसून तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यांनी कबुली दिली. मानवी तस्करीच्या आरोपाखाली त्यांना ताब्यात घेतलं आहे.

February 15, 2025 8:33 PM February 15, 2025 8:33 PM

views 10

मुंबई विमानतळावर सुमारे सव्वा सात किलो सोनं जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीचं सुमारे सव्वा सात किलो सोनं काल रात्री जप्त केलं. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत  सुमारे साडेसहा कोटी रुपये इतकी आहे. दुबईहून आलेल्या तीन प्रवाशांना याप्रकरणी अटक केली आहे. 

January 12, 2025 3:52 PM January 12, 2025 3:52 PM

views 15

मुंबई विमानतळावर सव्वा किलो सोनं,३० किलो गांजा आणि परकिय चलन जप्त

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी काल आणि परवा केलेल्या वेगवेगळ्या कारवायांत सव्वा किलो सोनं, ३० किलो गांजा आणि परकिय चलन जप्त केलं आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत ९१ लाख ४३ हजार रुपये इतकी असून गांजाची किंमत ३० कोटी ३६० लाख रूपये इतकी आहे.   रस अल खैमाह इथून सोनं तर बँकाँक इथून गांजाची तस्करी करण्यात आली आहे. तसंच मुंबईहून दुबईला जाणाऱ्या दोन प्रवाशांकडून २० हजार युरो डाँलर् इतकं विदेशी चलन जप्त करण्यात आलं असून याची किंमत १७ लाख ४६ हजार इतकी आहे. सीमा...

December 21, 2024 3:05 PM December 21, 2024 3:05 PM

views 2

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गांजा जप्त

सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा केलेल्या कारवाईत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून ११ किलो पेक्षा जास्त हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. जप्त कलेल्या अमली पदार्थाचे बाजारमूल्य अंदाजे ११ कोटी ३२ लाख रुपये असल्याचं सीमा शुल्क विभागानं म्हटलं आहे. या संदर्भात विभागाला माहिती मिळाली होती, त्याआधारे ही कारवाई केली केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर बँकॉक इथून आलेल्या एका प्रवाशाची झडती घेतली, तेव्हा त्याच्या बॅगमध्ये लपवून ठेवलेले अंमली पद...

October 16, 2024 3:31 PM October 16, 2024 3:31 PM

views 18

मुंबई विमानतळावर प्रवाशाकडून ३ कोटी ४६ लाख रुपयांचा गांजा जप्त

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून गांजा पकडला. हा गांजा साधारण ३ कोटी ४६ लाख रुपये किमतीचा आहे. हा गांजा खाद्यपदार्थांच्या पाकिटात भरुन प्रवाशाने ती पाकीटं आपल्या जवळच्या ट्रॉलीत ठेवली होती. दुबईहून आलेल्या एका प्रवाशाने कर चुकवून आणलेलं सोनंही सीमाशुल्क विभागानं जप्त केलं. हे २४ कॅरेट सोनं सळ्यांच्या स्वरुपात एका शिवणयंत्रात लपवून आणलं होतं.