July 11, 2025 2:49 PM July 11, 2025 2:49 PM
4
मुख्यमंत्री सेहत योजनेला मान्यता
पंजाब मंत्रिमंडळाने १० लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस वैद्यकीय उपचार देण्यासाठी मुख्यमंत्री सेहत योजनेला मान्यता दिली आहे. ही योजना येत्या २ ऑक्टोबरपासून सुरू होईल. या योजनेअंतर्गत नागरिकांना सामान्य सेवा केंद्रांवर आरोग्य कार्ड दिले जाणार आहेत. याव्यतिरिक्त नागरिकांना आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र वापरून आरोग्य कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येईल. पंजाबमधल्या तीन कोटी नागरिकांना याचा लाभ होणार आहे.