August 31, 2024 7:01 PM August 31, 2024 7:01 PM
13
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून नागपूरात सुरुवात
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आज नागपूर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरूवात झाली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक कोटी साठ लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले असून १ हजार ५६२ कोटींहून अधिक रुपये वितरित झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. हे सरकार दिलेला शब्द पाळणारं सरकार असून ही योजना कधीही बंद होणार नाही अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उप...