July 14, 2025 3:05 PM July 14, 2025 3:05 PM

views 11

वारंवार अटक होऊनही जामिनावर सुटणाऱ्या आरोपींच्या कायद्यात दुरुस्ती करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

राज्यात अमली पदार्थांच्या विक्रीत वारंवार अटक करण्यात येऊनही जामीनावर सुटणाऱ्या आरोपींना मोक्का लावण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे आणि कायदेशीर अज्ञान असणाऱ्या आरोपींचे वय कमी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.   अमली पदार्थांच्या धंद्यात अल्पवयीन मुलांना सामील करुन घेण्यात येते आणि त्यांच्यामार्फत हे पदार्थ विक्री करून कायद्यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यामुळे कायद्याच्या व्याख...

September 17, 2024 10:05 AM September 17, 2024 10:05 AM

views 9

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी राज्यातल्या 6 लाख 25 हजार 139 ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज पात्र

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी राज्यातल्या 6 लाख 25 हजार 139 ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज पात्र ठरले आहेत. या योजनेअंतर्गत 65 वर्षांवरील पात्र ज्येष्ठ नागरिकांना एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. या ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणारं अपंगत्व, अशक्तपणा यावरच्या उपाययोजनांसाठी आवश्यक सहाय्य साधनं खरेदीसाठी, मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्रातल्या प्रबोधन आणि प्रशिक्षणाकरता हे अर्थसहाय्य मिळणार आहे.