November 22, 2025 7:16 PM November 22, 2025 7:16 PM

views 19

शालेय मुलामुलींसाठी राज्य परिवहन महामंडळ हेल्पलाईन सुरू करणार असल्याची परिवहन मंत्र्यांची माहिती

शालेय मुलामुलींसाठी राज्य परिवहन महामंडळ लवकरच हेल्पलाईन सुरू करत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला आज भेट दिल्यानंतर ते बोलत होते. शाळा आणि घर या दरम्यान बस प्रवासात काही अडचण आल्यास, बस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द झाल्यास विद्यार्थ्यांना योग्य ती मदत मिळावी, या उद्देशाने ही हेल्पलाईन सुरु केली जाईल. तसंच ३१ विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे संपर्क क्रमांक संबंधित शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांना देण्यात येती...

November 16, 2025 3:42 PM November 16, 2025 3:42 PM

views 117

राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटीच्या नवीन बस मिळणार

राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या नवीन बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता यावा हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. याअंतर्गत एसटीच्या राज्यभरातल्या दोशने एक्कावन्न आगारांमधून दररोज आठशे ते हजार बस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सहलींसाठी शाळा महाविद्यालया...

November 14, 2025 6:19 PM November 14, 2025 6:19 PM

views 27

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री’

एसटी, अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं उत्पन्नवाढ, कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी सर्वसमावेशक ‘पंचसूत्री आराखडा’ तयार केला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मुंबईत ही माहिती दिली. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आगार पातळीपासून प्रादेशिक कार्यालयापर्यंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी अधिक स्पष्ट करत, सुधारणा, ‘वेग’ आणि ‘नियमितता’ या आधारे एसटी महामंडळाला पुढे नेण्याचा निर्धार केल्याचं त्यांनी सांगितलं....

November 4, 2025 2:40 PM November 4, 2025 2:40 PM

views 38

मालकीच्या जागांवर इंधन विक्री सुरू करणार, परिवहन मंत्र्यांची माहिती

उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळ राज्यभरात आपल्या मालकीच्या २५०पेक्षा जास्त जागांवर इंधन विक्री सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या ठिकाणी व्यावसायिक तत्वावर पेट्रोल, डीझेलबरोबरच सीएनजी तसंच इलेक्ट्रिक चार्जिंग उपलब्ध असतील.    दरम्यान, एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची थकबाकीची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. एस टी महामंडळानं आज प्रसिद...

October 26, 2025 8:55 AM October 26, 2025 8:55 AM

views 117

राज्य परिवहन महामंडळाचं शयनसुविधा असलेल्या बसगाड्यांसाठी ‘सजग प्रवासी, सुरक्षित प्रवास’ अभियान सुरू

आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी बसला लागलेल्या आगीत 20 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद देण्याकरिता राज्य परिवहन महामंडळानं शयनसुविधा असलेल्या बसगाड्यांसाठी 'सजग प्रवासी, सुरक्षित प्रवास' अभियान सुरू केलं आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काल दिली. परिवहन विभागानं दिलेल्या सूचनांनुसार प्रवाशांनी काही बाबींचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. त्यानुसार, बसमध्ये बसल्य...

April 28, 2025 7:05 PM April 28, 2025 7:05 PM

views 13

एसटी महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीची श्वेत पत्रिका काढण्याचे परिवहनमंत्र्यांचे आदेश

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसंच भविष्यातल्या नियोजनासाठी एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी. असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. ते आज एसटीच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये बोलत होते.    सुमारे १० हजार कोटी रुपये संचित तोटा सहन करणाऱ्या एसटी महामंडळाला सध्या किती उत्पन्न मिळतं? किती खर्च येतो? किती देणी बाकी आहेत, या सर्वांचा लेखा-जोखा मांडणारी श्वेतपत्रिका काढून त्यातून एक आर्थिक शिस्त निर्माण करणं गरजेच...

March 23, 2025 7:52 PM March 23, 2025 7:52 PM

views 19

गडचिरोली जिल्ह्यातल्या अतिदुर्गम गावांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस फेऱ्या सुरू

गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, पेंढरी आणि रांगी या शेवटच्या टोकाच्या तीन अतिदुर्गम गावांसाठी राज्य परिवहन महामंडळानं बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. यामुळे या गावातील आदिवासी बांधवांची मोठी सोय झाली आहे. या नागरिकांनी बस सुरू करण्याच्या मागणीचं निवेदन राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  दिलं होतं. त्यावर फडणवीस यांनी तत्काळ कार्यवाही केली.

January 25, 2025 7:24 PM January 25, 2025 7:24 PM

views 62

महाराष्ट्रात एसटीची भाडेवाढ आजपासून लागू

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासभाड्यात आजपासून १४ पूर्णांक ९५ शतांश टक्के वाढ करण्यात आली आहे.   हकीम समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार ही भाडेवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानुसार साध्या बसचं भाडं ६ किलोमीटर प्रति टप्प्यासाठी ११ रुपये, जलद सेवा बससाठी ६ किलोमीटर प्रति टप्प्यासाठी ११ रुपये, रात्र सेवा बस ११ रुपये, निम आराम १५ रुपये, विनावातानुकूलीत शयन आसनी १५ रुपये, विनावातानुकूलीत शयनयान १६ रुपये, शिवशाही साठी ६ किलोमीटर प्रति टप्प्यासाठी १६ रुपये भाडे आकारण्यात येणार...

December 19, 2024 9:24 AM December 19, 2024 9:24 AM

views 15

एसटीला नोव्हेंबर महिन्यात ९४१ कोटी रुपये उत्पन्न

दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांची संख्या वाढल्यानं एसटी महामंडळाला नोव्हेंबर महिन्यात ९४१ कोटी रुपये उत्पन्न मिळालं. हे यंदाच्या वर्षातील सर्वाधिक मासिक उत्पन्न आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांनी प्रवास केला. मागील वर्षाच्या याच काळातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे २६ कोटी रुपयांनी जास्त आहे. हे विक्रमी उत्पन्न एसटीवरील सर्वसामान्य प्रवाशांच्या विश्वासाचं द्योतक आहे, असं महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी सांगितलं. मात्र इंधनाचे वाढते...