March 22, 2025 8:08 PM March 22, 2025 8:08 PM

views 16

महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी पुरस्कार

सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी वीज कंपनी म्हणून केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळानं महावितरणचा गौरव केला आहे. शुक्रवारी नवी दिल्ली इथं झालेल्या समारंभात महावितरणच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला.    महावितरण मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्याला वीज पुरवठा करते. कंपनीचे  घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आणि कृषी असे 3 कोटी 11 लाख ग्राहक असून, ती देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे.   ग्राहक सेवेसाठी आणि वीज वितरणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर, ऊर्जा परिवर्तन आराखड...

March 14, 2025 3:33 PM March 14, 2025 3:33 PM

views 25

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी शेअर बाजारात उतरणार

येत्या २ वर्षात शेअर बाजारात नोंदणी करण्याचं महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं नियोजन आहे, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी दिली. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधानसभेत याचे सूतोवाच केलं होते. येत्या ५ वर्षात नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून मिळणाऱ्या वीजेचे एकूण वीज वितरणातलं प्रमाण १३ टक्क्यांवरुन ५२ टक्क्यांपर्यंत नेण्याचं नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. 

December 31, 2024 8:01 PM December 31, 2024 8:01 PM

views 152

ईमेलद्वारे वीजबिल स्वीकारणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून नववर्षाची भेट

केवळ ईमेलद्वारे वीज बिल स्वीकारणाऱ्या ग्राहकांना महावितरणनं नववर्षाची भेट म्हणून वीजदेयकावर एकाच वेळी १२० रुपयांची सवलत देऊ केली आहे. कागद वाचवा, पर्यावरण सांभाळा या संकल्पनेशी सुसंगत असणाऱ्या या योजनेनुसार दर महिन्याच्या देयकावर  १० रुपयांची सवलत दिली जात होती. मात्र आता नव वर्ष भेटीदाखल एकाच वेळी १२० रुपयांची सवलत मिळू शकेल.