October 6, 2025 8:24 PM October 6, 2025 8:24 PM

views 88

MPSC कडून ९३८ पदांच्या भर्तीसाठी गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध

MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात आज प्रसिद्ध केला. या अंतर्गत ९३८ पदांसाठी ४ जानेवारी २०२६ रोजी परीक्षा होईल. यासाठी ७ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर दरम्यान अर्ज करता येईल.    यात उद्योग निरीक्षक संवर्गातली ९ पदं, तांत्रिक सहायक संवर्गासाठी ४ पदं, कर सहायक संवर्गासाठी ७३ पदं, तसंच लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी ८५२ पदांचा समावेश आहे. विविध श्रेणीत १८ ते ४३ वयोगटातले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. दिव्यांग, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी...

September 26, 2025 7:41 PM September 26, 2025 7:41 PM

views 29

नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची नवी तारीख जाहीर!

राज्य लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी होणारी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पुढं ढकलण्यात आली असून ती आता येत्या ९ नोव्हेंबरला होईल. राज्यातल्या अनेक भागात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून येत्या दोन दिवसात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असल्यामुळे, ही परीक्षा पुढं ढकलण्याची मागणी शासनाकडे होत होती. त्यानुसार राज्यसरकारने आयोगाला विनंती केल्यामुळे हा बदल झाला आहे.    ९ नोव्हेंबरला गट - ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा नियोजित होती. ती ...

January 30, 2025 8:08 PM January 30, 2025 8:08 PM

views 7

लोकसेवा आयोगाच्या गट ब पदासाठीच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्याचं MPSC चं स्पष्टीकरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब पदासाठीच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असून उमेदवारांनी अपवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन आयोगाच्या सचिव  डॉ. सुवर्णा खरात यांनी केलं आहे. त्या नवी मुंबई इथं पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. येत्या रविवारी २ फेब्रुवारी ला   'महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४' होणार आहे. त्याची प्रश्नपत्रिका उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवून पैशाची मागणी केली जात असल्याचं वृत्त पुण्याच्या एका दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर आयोगाने हा खुलासा केला आहे. या...

December 17, 2024 7:50 PM December 17, 2024 7:50 PM

views 56

MPSC 2025 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

एम.पी.एस.सी. अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ष  २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचं  अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केलं  आहे.    

September 26, 2024 6:49 PM September 26, 2024 6:49 PM

views 13

MPSCकडून राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करुन दिली जाईल, असं आयोगानं कळवलं आहे.  ही यादी विविध न्यायालयांमधे दाखल असलेल्या प्रकरणांवरच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून जाहीर केली असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे.

September 23, 2024 7:35 PM September 23, 2024 7:35 PM

views 6

MPSC च्या राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत राज्यशासनाच्या कृषि सेवेतल्या पदांचा समावेश

MPSC च्या राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत राज्यशासनाच्या कृषि सेवेतल्या पदांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आज नवी मुंबईत बेलापूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विविध संवर्गांच्या एकूण २७४ रिक्त पदांकरीता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ ची जाहिरात गेल्या डिसेंबरमधे प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर कृषी विभागतल्या २५८ पदांसाठीची मागणी आयोगाला मिळाली. शासनाच्या विनंतीनुसार या पदांचा समावेश  त्याच परीक्षेत करण्यात आला असून आता ...

August 22, 2024 1:18 PM August 22, 2024 1:18 PM

views 13

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलली

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परीक्षेची नवी तारीख लवकराचं जाहीर करण्यात येईल असं आयोगानं समाज माध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

August 17, 2024 8:13 PM August 17, 2024 8:13 PM

views 15

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन परिक्षांचं आयोजन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट-ब साठी संयुक्त चाळणी परीक्षेचं उद्या १८ ऑगस्टला तर, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ या परीक्षेचं आयोजन येत्या २५ तारखेला करण्यात आले आहे. याचवेळी IBPS ने देशपातळीवर परीक्षा आयोजित केल्या आहेत. त्यामुळं MPSC नं परीक्षाच्या तारखा बदलाव्या अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशारा काँग्रेसनं दिला आहे.

July 3, 2024 9:14 AM July 3, 2024 9:14 AM

views 9

‘एमपीएससी’ची महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा-२०२३ पुढे ढकलली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा-२०२३ लिपिक टंकलेखक आणि कर सहायक, या संवर्गाकरता घेण्यात येणारी, टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा १ जुलै ते १३ जुलै दरम्यान घेण्यात येणार होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, सुधारित तारीख स्वतंत्रपणे घोषित करण्यात येईल, असं आयोगानं कळवलं आहे.