August 19, 2024 10:34 AM August 19, 2024 10:34 AM
10
एमपॉक्सवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश
प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉक्टर पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत एमपॉक्स या रोगाच्या साथीला तोंड देण्याच्यादृष्टीनं देशभरातील सज्जतेच्या सद्य स्थितीचा आणि त्या अनुषंगानं सार्वजनिक आरोग्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री मोदी देशातील एमपॉक्सच्या परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून असल्याचं मिश्रा यांनी सांगितलं. एमपॉक्सच्या प्रकरणांचं तातडीनं निदान केलं जावं आणि त्यावर अधिक बारकाईनं लक्ष ठेवण्यात यावं असे निर्देश मिश्रा यांनी याव...