March 22, 2025 3:12 PM March 22, 2025 3:12 PM

views 10

लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना न्याय्य पद्धतीने झाली पाहिजे- सुप्रिया सुळे

लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना न्याय्य पद्धतीने झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पुनर्रचनेसंदर्भात तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी बोलावलेली पहिली सर्वपक्षीय बैठक आज चेन्नई इथं झाली.   त्या पार्श्वभूमीवर सुळे बोलत होत्या. सामाजिक दृष्ट्या प्रगल्भता दाखवत दक्षिणेकडच्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात बाजी मारली आहे. लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर त्या राज्यां...

February 18, 2025 3:21 PM February 18, 2025 3:21 PM

views 10

धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असतील, तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणाला ६९ दिवस पूर्ण झाले तरी अद्याप तपास पूर्ण झालेला नाही. आपण येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत, असंही सुळे यावेळी म्हणाल्या. 

September 6, 2024 7:04 PM September 6, 2024 7:04 PM

views 10

महायुतीचं सरकार अडचणींच्या भोवऱ्यात सापडलेलं असून ते लवकरच पडेल – खासदार सुप्रिया सुळे

राज्यात सध्या अस्तित्वात असलेलं महायुतीचं सरकार अडचणींच्या भोवऱ्यात सापडलेलं असून ते लवकरच पडेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना मांडलं. राज्यात सर्वाधिक गुंतवणूक आल्याचं सांगितलं जात आहे, मग नोकऱ्या का उपलब्ध होत नाहीत, असा सवालही सुळे यांनी विचारला.