April 28, 2025 3:23 PM April 28, 2025 3:23 PM

मध्य प्रदेशातल्या एकूण चित्त्यांची संख्या आता ३१ वर

भोपाळच्या कुनो राष्ट्रीय अभयारण्यात काल चित्त्याच्या पाच बछड्यांचा जन्म झाल्यामुळे मध्य प्रदेशातल्या एकूण चित्त्यांची संख्या आता ३१ झाली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी समाजमाध्यमांवर ही माहिती प्रसारित केली आहे. दक्षिण आफ्रिकेतून २०२२ साली मध्य प्रदेशात आणलेल्या नीरवा नावाच्या  चित्ता मादीने काल दुसऱ्यांदा बछड्यांना जन्म दिला आहे.   प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या चित्ता प्रकल्पाचे हे मोठं यश असल्याचं यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं असून कुनो राष्ट्रीय अभयारण्याच्या ...