June 3, 2025 3:37 PM June 3, 2025 3:37 PM
10
इटलीमधल्या माउंट एटना ज्वालामुखीचा उद्रेक
इटली मधल्या माउंट एटना या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यामुळे या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये घबराट पसरली. उद्रेकामुळे उत्सर्जित होणाऱ्या लाव्हारसाच्या प्रवाहानं नैसर्गिक धोक्याची पातळी ओलांडली नसून, त्यामुळे नागरिकांना कोणताही धोका नसल्याचं सिसिलीचे राष्ट्राध्यक्ष रेनाटो शिफानी यांनी म्हटलं आहे. ज्वालामुखीचा उद्रेक स्ट्रॉम्बोलियन स्फोटांमुळे झाला असून तो वाढत्या तीव्रतेच्या उद्रेकाचा एक प्रकार असल्याचं इटलीच्या राष्ट्रीय भूभौतिकशास्त्र आणि ज्वालामुखीशास्त्र संस्थेनं म्हटलं आहे.