February 4, 2025 7:54 PM February 4, 2025 7:54 PM
7
राष्ट्रपतींचं अभिभाषण विकसित भारताच्या संकल्पाला अधिक मजबूत करणारं- प्रधानमंत्री
राष्ट्रपतींचं अभिभाषण विकसित भारताच्या संकल्पाला अधिक मजबूत करणारं, नवा विश्वास निर्माण करणारं आणि जनतेला प्रेरणा देणारं होतं, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावावरल्या चर्चेला उत्तर देताना ते आज लोकसभेत बोलत होते. गेल्या दहा वर्षात २५ कोटी नागरिक गरिबी रेषेच्या वर आले, या कार्यकाळात गरीबांना चार कोटी घरं मिळाली असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. गेल्या दहा वर्षात बारा कोटी घरांत शौचालय आणि बारा कोटी घरांना नळजोडणी दिली गेली याचा उल्ले...