October 28, 2025 2:52 PM October 28, 2025 2:52 PM
70
मोंथा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशात अतिदक्षतेचा इशारा
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं 'मोंथा' चक्रीवादळ आज अधिक तीव्र झालं असून ताशी ९० ते १०० किलोमीटर वेगानं ते आज मध्यरात्रीच्या सुमारास आंध्रप्रदेशच्या काकीनाडा जिल्ह्यात मछलीपट्टण ते कलिंगपट्टणच्या दरम्यान थडकण्याची शक्यता आहे. श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापट्टणम, अनकापल्ली, पूर्व गोदावरी, कोनासीमा, काकीनाडा, कृष्णा, नेल्लोर आणि प्रकाशम जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. सखल भागात पाणी साचलं असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत आणि अत...