August 11, 2025 8:12 PM
19
नवीन प्राप्तिकर विधेयक लोकसभेत मंजूर
लोकसभेत आज कर आकारणी कायदे सुधारणा विधेयक, २०२५ आणि नव्यानं मांडलेलं प्राप्तिकर विधेयक, २०२५ ही दोन विधेयकं आवाजी मतदानानं मंजूर झाली. विविध कारणांवरून विरोधकांचा गदारोळ सुरु असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही विधेयकं सभागृहात मांडली. नव्यानं मांडलेलं प्राप्तिकर विधेयक २०२५ हे सहा दशकं जुन्या प्राप्तिकर कायदा, १९६१ ची जागा घेईल. भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालच्या संसदीय प्रवर समितीनं सुचवलेल्या २८५ शिफारसींचा यात अंतर्भाव केला आहे. याआधीच्या प्राप्तिकर व...