June 28, 2024 7:25 PM June 28, 2024 7:25 PM

views 16

‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ असा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अतिशय प्रगतिशील, सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय असा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केली.    शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा क्रांतीकारक निर्णय घेत बळीराजाच्या कष्टाचा आदर आणि सन्मान या अर्थसंकल्पात केल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं.

June 28, 2024 6:33 PM June 28, 2024 6:33 PM

views 10

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प असून महिला आणि बेरोजगारांना आर्थिक ताकद देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. केंद्राकडून राज्यांना मिळणाऱ्या कर हिश्श्यात वाढ होण्याची अपेक्षा असून अर्थसंकल्पात पर्यायांचा विचार केल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. पुढच्या महिन्यात पुरवणी मागण्यांमध्येही तरतुदी केल्या जातील, असं ते म्हणाले.

June 28, 2024 5:53 PM June 28, 2024 5:53 PM

views 17

महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा

बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केली. या अंतर्गत २१ ते ६० वर्ष वयोगटातल्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी एकूण ४६ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. राज्यातल्या अडीच कोटींहून अधिक महिलांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक घरामागे ३ गॅस सिलिंडर मोफत देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचीही घोषणा अजित पवार यांनी आज केली. ५२ लाखांहून अधिक कुटुंबांना याचा लाभ होईल.    चालू शैक्षणिक वर्...

June 28, 2024 5:14 PM June 28, 2024 5:14 PM

views 23

वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’ स्थापन करण्याची घोषणा

वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’ स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आजच्या अर्थसंकल्पात केली. यातून किर्तनकार, वारकरी, भजनीमंडळ यांना सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. तसंच पालखी मार्गांचं व्यवस्थापन केलं जाईल, असं ते म्हणाले. पंढरपूर वारीला जागतिक नामांकनासाठी मिळावं यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली. याशिवाय कोकणातली कातळशिल्पे, दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सवाचाही प्रस्ताव पाठवला जाईल. यावर्षीपासून वारीतल्या मुख्य पालख्यांतल्या...

June 28, 2024 5:48 PM June 28, 2024 5:48 PM

views 24

शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजने’ची घोषणा

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी सरकारनं मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात केली. यात 44 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या साडे ७ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या  शेतीपंपांना पूर्णत: मोफत वीज पुरवली जाईल. याशिवाय मागेल त्याला सौरउर्जा पंप देण्याची योजनाही सरकारनं जाहीर केली. साडे 8 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जाईल. नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्‍यासाठी ई-पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू होणार आहे.    गाव तेथे गोदाम योजनेची घोषणा सरकारनं केली असून यात पहिल्या ट...

June 28, 2024 4:58 PM June 28, 2024 4:58 PM

views 153

दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना’ जाहीर

सर्व स्वरुपातलं सार्वत्रिक दारिद्र्य नाहीसं करण्याचं शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याचा मानस राज्य सरकारनं जाहीर केला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून आता दरमहा एक हजार ऐवजी दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जाईल. दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना’ सरकारनं जाहीर केली आहे. त्यात पहिल्या टप्प्यात 34 हजार 400 घरं बांधली जाणार आहे. बारी समाजाच्या विकासासाठी संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना निर्णय सरकारनं या अर्थस...

June 28, 2024 5:50 PM June 28, 2024 5:50 PM

views 21

युवकांसाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने’ची घोषणा

युवकांना प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण मिळावं यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने’ची घोषणा या अर्थसंकल्पात झाली. याअंतर्गत दहा लाख युवकांना वर्षभर कामाचं प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यासाठी दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन राज्य सरकार देईल. शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी 50 हजार युवकांना कार्यप्रशिक्षण सरकार देणार आहे. 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जावाढ, मॉडेल आय.टी.आय, जागतिक कौशल्य केंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डेटा सेंटर अशा विविध सं...

June 28, 2024 3:20 PM June 28, 2024 3:20 PM

views 41

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२४ : विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प सादर

अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतूद   मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची उपमुख्यमंत्र्यांकडून घोषणा. २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देणार. दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांचा निधी राखीव. जुलै २०२४ पासून योजनेची अंमलबजावणी सुरू होणार. १७ शहरात १० हजार महिलांना पिंक  रिक्षा खरेदीसाठी निधी देणार ८० कोटी रुपये राखीव. नोंदणीकृत विवाह करणाऱ्या महिलांना १० हजार रुपयांच्या ऐवजी २५ हजार रुपये अनुदान. २१ लाखांहून अधिक घरांना नळ जोडणी देण्याचे काम प्रगतीपथावर. महिलांना स्वच्छ इंधनास...