July 23, 2024 3:19 PM July 23, 2024 3:19 PM
16
समाजाच्या प्रत्येक घटकाचा विकास साधणारा अर्थसंकल्प – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
केंद्रीय अर्थसंकल्प हा ग्रामीण, दुर्बल तसंच शेतकऱ्यांना समृद्धीची वाट दाखवणारा आणि युवावर्गासाठी संधी निर्माण करणारा आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिली. समाजाच्या प्रत्येक घटकाचा विकास साधणारा असा हा अर्थसंकल्प असल्याचं ते म्हणाले. २०४७ सालच्या विकसित भारताच्या उद्दिष्टाची पायाभरणी या अर्थसंकल्पातून करण्यात आली असून देशाला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठीची ही सुरुवात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.